रत्नागिरी आर्मी च्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद, पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन केले कौतुक
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या ‘रत्नागिरी आर्मी’ चा पहिला उपक्रम असलेल्या रक्तदान शिबिराला रत्नागिरी मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक स्त्री पुरुष रक्तदात्यांनी या कोरोना संक्रमणाच्या काळात जागरूक नागरिक म्हणून या उपक्रमात भाग घेऊन रक्तदान केले.
रत्नागिरीची संस्कृती जपावी, कायद्याचे पालन करण्याबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांमध्ये असलेल्या सामाजिक भावनेला एकत्र येऊन प्रतिसाद मिळाव आणि त्यातून चांगले समाजोपयोगी उपक्रम व्हावे या उद्देशाने अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन रत्नागिरी आर्मी ची स्थापना केली आहे. यासाठी डॉ मुंढे यांच्यासह संपूर्ण पोलीस विभाग या आर्मी च्या उपक्रमामागे उभे आहे. या आर्मीच्या पहिला उपक्रम म्हणून 31 मार्च रोजी रत्नागिरी येथील स्वा. विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी आणि रत्नागिरी आर्मीचे सर्व सैनिक यावेळी उपस्थित होते.
कोरोना संक्रमणाच्या काळात लॉक डाऊन च्या काळात सर्व नियम पाळत सकाळी 11 ते 2 या वेळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी या उपक्रमाला भेय दिली आणि सर्वांचे कौतुक केले. यात सहभागी रक्तदात्याना प्रमाणपत्र देण्यात आले.