
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने ८ कोरोना बाधित रुग्ण आढळले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 8 जणांचे कोवीड – 19 तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील 6 जणांचा, वैभववाडी तालुक्यातील 1 आणि मालवण तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे.नव्याने आढळलेल्या 8 रुग्णांपैकी कणकवली तालुक्यातील असलेल्या 4 रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. तर दोन व्यक्तींनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून प्रवास केला आहे. मालवण तालुक्यातील रुग्ण हा ठाणे येथून आलेला आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्ण हा प्रभादेवी मुंबई येथून आलेला आहे. या नवीन 8 रुग्णांमध्ये 4 महिला व 4 पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.8 नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 16 झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात आढळलेल्या 8 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 5 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 2 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर जुन्या 8 पैकी 1 रुग्ण व आज नव्याने आढळलेले 8 रुग्ण असे सद्या एकूण 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com