
खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपापले दवाखाने सुरू ठेवावेत -ना.उदय सांमत
खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपापले दवाखाने सुरू ठेवावेत, अशी सूचना ना.उदय सांमत यांनी केली आहे त्याबाबत कार्यवाही झाली नाही, तर त्यांना समज देण्यात येईल. पुरेशी काळजी घेऊन इतर रुग्ण तपासताना करोनाचा रुग्ण आढळला तर तो खासगी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवायचा आहे असेही
सांमत यांनी सांगितले
रत्नागिरी जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील १२६ डॉक्टर, जिल्हा रुग्णालयातील ६९, खासगी रुग्णालयांचे २३८ आणि दवाखाने चालविणारे ४९१ डॉक्टर असे सुमारे दीड ते दोन हजार डॉक्टर आहेत.
www.konkantoday.com