
लॉकडाऊन मुळे विस्थापित कामगारांच्या निवारागृह, अन्नधान्य व भोजन व इतर व्यवस्थेसाठी कोकण विभागाला १५ कोटी मंजुर
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच
लॉकडाऊन मुळे विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार
यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य व भोजन व इतर व्यवस्थेसाठी करावयाच्या
तातडीच्या उपाययोजनासाठी शासनाकडून कोकण विभागा करिता एकूण पंधरा कोटी रुपये मंजूर झाले आहेत.मा. अजय मेहता,मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली
आपत्ती व्यवस्थापन राज्य कार्यकारी समितीची बैठक संपन्न होवून निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
www.konkantoday.com