
रत्नागिरीत अनेक ठिकाणी उपाशी कामगारांना पोलिसांकडून मदतीचा हात
रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी बाहेरून रोजंदारी साठी आलेले कामगार आहेत सध्याच्या परिस्थितीत सर्व उद्योग धंदे बंद झाल्याने या कामगारांचा रोजगार बंद झाला आहे त्यामुळे उपाशी असलेल्या कामगार रत्नागिरीत काही ठिकाणी फिरताना दिसत आहेत सकाळी डीएसपी ऑफिस जवळ असे कामगार जमले होते रत्नागिरी शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल लाड यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी तेथे जाऊन या कामगारांचे खाण्याची व्यवस्था केली तसेच असेच कामगार रत्नागिरीतील केसी जैन नगर येथे जमले होते त्या ठिकाणी देखील पोलीस निरीक्षक लाड यांनी या कामगारांना बिस्किटे देण्याची व्यवस्था केली या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश संसारे आदिनी पुढे येऊन या कामगारांना बिस्किटाचे पुडे उपलब्ध करून दिले शहरातील पोलीस माणुसकीच्या भावनेने काम करीत असले तरी आता या सर्वांचे नियोजन होणे आवश्यक आहे केसी जैन नगरमध्ये असलेली मंडळी कोकण नगर भागातील होती आता त्या भागातील नगरसेवकांनी आपल्या भागात अशी कोण मंडळी आहेत यांची माहिती गोळा केली असती या कामगार मंडळींना शहरात फिरावे लागले नसते प्रत्येक वॉर्डातून अशा माणसांच्या याद्या झाल्या तर काही सामाजिक संस्था ही मदत करण्यात पुढे येऊ शकतील मात्र साठी नियोजनाची गरज आहे
www.konkantoday.com