
टाटा ग्रुपकडून एकत्रितपणे एकूण १५०० कोटींची मदत निधी जाहीर
देशावरील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अशातच आज भारतातील नामांकित उद्योग समूह असलेल्या टाटा ग्रुपने कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी ५०० कोटींची मदत कोरोना विषाणूशी लढण्याकरता जाहीर केल्यानंतर टाटा ग्रुपच्याच टाटा सन्सकडून देखील १ हजार कोटींची मदत जाहीर झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी टाटा ग्रुपकडून एकत्रितपणे एकूण १५०० कोटींचा मदत निधी जाहीर झाला आहे.
या निधीबरोबरच व्हेंटिलेटर आणण्यासाठी तसेच भारतातच व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले.
www.konkantoday.com