केरळमध्ये मिळणार प्रिस्क्रिप्शनवर मद्य?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये लोकडाऊन आहे.या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशात मद्यविक्री करणारी दुकानेही बंद आहेत.मद्यविक्री दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांची चांगलीच अडचण झाल्याचे दिसत आहे.केरळ मध्ये तर मद्य न मिळाल्यामुळे काही लोकांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी देखील समोर आल्या आहेत.तसेच मद्य न मिळाल्याने काही मद्यपींच्या शरीरावर नकारात्मक परिणाम देखील झाल्याचे दिसून आले आहे.आधीच कोरोनामुळे डोकेदुखी वाढलेल्या केरळ सरकार पुढे आता नविन समस्या उभी ठाकली आहे.या साऱ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारने एक अजब निर्णय घेतला आहे.केरळ राज्यामध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मद्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला.मात्र या अजब निर्णयाला डॉक्टरांनी विरोध केला आहे.आधीच आमच्यावर कोरोनामुळे ताण आहे व अशाप्रकारच्या निर्णयामुळे तो अधिकच वाढणार आहे असेही काही डॉक्टरांनी सांगितले.तसेच डॉक्टरांनी मद्यासाठी प्रिस्क्रिप्शन देणे हे कुठेही नीतिशास्त्रात बसत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.केरळा गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर्स असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने सरकारच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.उद्या लोक हॉस्पिटलसमोर मद्य मिळण्याच्या सर्टिफिकेटसाठी रांगा लावतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होऊ शकते.मद्यपींच्या शरीरावर होणाऱ्या नकारात्मक लक्षण हि एक समस्या असून या समस्येसाठी आमच्याकडे औषध उपलब्ध आहेत व ती आम्ही त्यांना प्रिस्क्राइब करू असे देखील डॉक्टरांनी सांगितले.त्यामुळे आता या निर्णयाचे काय होत हे पाहावं लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button