काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका- आ.शेखर निकम
कोकणातील मुख्य व जास्त उत्पादन असलेल्या काजू फळपीक उत्पादक शेतकऱ्यांनी या करोनाच्या उदभवलेल्या संकटामुळे काजु बी विक्री होईल का म्हणून घाबरून जाऊ नका व कमी किमतीत कोणीही काजु बी विक्री करू नका असे आवाहन आ.शेखर निकम यांनी केले आहे. काजू बी ही नाशवंत नसल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जायची आवश्यकता नाही .आपल्या कडील काजु बी चांगल्या पद्धतीने सुकवून साठवून ठेवाव्यात.काजु बी किमान २-३ दिवस उन्हामध्ये सुकवून गोणीत भरून ठेवाव्यात.महाराष्ट्रातील काजू बीचे उत्पादन अडीच लाख मेट्रिक टन आहे तसेच देशांतर्गत काजू बीचे उत्पादन जवळपास साडे सात लाख मेट्रिक टन आहे उत्पादनापेक्षा प्रक्रिया क्षमता अधिक असल्यामुळे जिल्ह्यात व राज्यात उत्पादित होणारी सर्व काजू बी विक्री होऊ शकते मागील 3 वर्षांपासून काजू उद्योगाची परिस्थिती ही चिंताजनक आहे त्यात ही लॉकडाउनची परिस्थिती संकट म्हणून समोर आली आहे. ही परिस्थिती थोडी निवळल्या नंतर काजू उत्पादक शेतकरी, काजू प्रक्रिया उद्योजक व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढू असे त्यानी सांगितले.
www.konkantoday.com