रत्नागिरी नगर परिषदेच्या मास्क वाटपाकडे रत्नागिरीकर डोळे लावून
संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रातही कराेनाचे रुग्ण वाढत्या प्रमाणात सापडू लागल्याने आता नागरिक आपल्या परीने काळजी घेत आहेत यासाठी ते स्वतःच्या पैशाने मास्क खरेदी करीत आहेत जर अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जावे लागले तर ते मास्क वापर करीत आहेत . असे असले तरी रत्नागिरी नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने दहा हजार मास्क खरेदी केले असून त्याचे वाटप नागरिकांना केले जाणार असल्याचे प्रसिद्ध माध्यमांकडे जाहीर केले होते परंतु आता इतके दिवस उलटूनही हे मास्क अजून नागरिकांपर्यंत पोचले नसल्याने ते नेमके गेले कुठे व नागरिकांना ते कधी मिळणार याकडे नागरिकांचे डोळे लागून आहेत
www.konkantoday.com