
स्वामीस्वरूपानंद पत संस्थेने 200 कोटींचा ठेव टप्पा केला पूर्ण:-ॲड.दीपक पटवर्धन
स्वामी स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेवी 27 मार्च रोजी 200 कोटी 91 लाख झाल्या असून संस्थेने 31 मार्च पूर्वी दोन दिवस आधीच 200 कोटी ठेविचा इष्टांक पूर्ण केला 200 कोटींचा ठेव टप्पा हा खूप महत्त्वाचा असून ठेवीदारांच्या विश्वासावर संस्थेचे अर्थकारण अधिक व्यापक होत आहे केवळ 10 हजारांचे भांडवल ते 200 कोटी ठेवी हा संपूर्ण प्रवास केवळ विश्वासार्हता आर्थिक शिस्त आणि ग्राहकाभिमुख धोरणे आणि सहकाराला व्यवसायिकते ची दिलेली जोड याच फलित म्हणावं लागेल अस ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.
कोरोना संकटामुळे अगदी समीप आलेलं उद्दिष्ट संस्था गाठणार का याबद्दल थोडी अस्वस्थता होती मात्र ठेवीदारांनी दिलेली साथ उद्दिष्ट पुर्ती साठी पर्याप्त ठरली आणि वेळेच्या आधी 200 कोटी ठेविचा आकडा पार झाला 17 शाखांच्या माद्यमातून सुमारे 45 हजार ठेव खात्यां चे माध्यमातून 200 कोटीची ठेव संकलित झाली
अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे 29 वर्षयांच्या प्रवासात संस्थेशी संलग्न झालेल्या प्रत्येक ग्राहका प्रति कृतज्ञ होण्याची ही वेळ आहे.कोकणात सहकार दुर्मिळ असताना नेटक्या पद्धतीने कामकाज करत पत संस्थेने अर्थकारणात अग्रेसर राहात सहकार चळवळी ला आदर्शवत ठरावे असे काम केले आहे.
कर्ज व ठेव याचे आदर्श प्रमाण राखत सातत्याने जवळजवळ शतप्रतिशत वसुली ठेवत सातत्याने नफा वृद्धिंगत करत स्वनिधी मध्ये वाढ करत संस्थेने 29 वर्ष सातत्यपूर्ण मार्गक्रमण केले अवाच्या सव्वा ठेव व्याजदर न देता ठेवींची सुरक्षितता आणि संयत परतावा नियमित देत राहण्याचे धोरण यशस्वी झाले असे पटवर्धन म्हणाले भविष्यात अधिक सुरक्षित पद्धतीने आर्थिक व्यवहार करू संस्थेचा कार्यविस्थार केला जाईल नवीन तंत्रसज्ञानाचा वापर करून अधिक सेवा सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतील
अत्ता संपूर्ण जगच कोरोना रोगामुळे त्रस्थ आहे व्यवसाय उद्योग ठप्प आहे अर्थजगत थिजल आहे अश्या स्थितीत 200 कोटी चे संकलनाचा आनंद सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून साजरा करावा असा निर्णय घेऊन या कठीण स्थिती सापडलेल्या नागरिकांना जीवनावश्यक बाबींचा पुरवठा करण्याचे अभियान संस्थेने हाती घेतले आहे . ज्या 17 ठिकाणी संस्थेच्या ब्रँच आहेत त्या प्रत्येक गावात स्वरूप भेट ही जीवनावश्यक वस्तूंची भेट गर्जु ना दिली जाईल या विपरीत स्थितीत काम करणाऱ्या प्रशासन यंत्रणेला ही मदत करण्या साठी योजना आखत आहोत 200 कोटींचा इष्टांक पूर्तीचा हा आनंद संस्थेचे संचालक ,अधिकारी, कर्मचारी, एजंट सभासद ग्राहक अश्या सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक बांधिलकी जपत भरीव आर्थिक मदत देत साजरा करू असे दीपक पटवर्धन म्हणाले
सर्व हितचिंतक, ठेवीदार,ग्राहक याना उद्दिष्ट पूर्ती साठी सहकार्य दिल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद.