
संचारबंदीचा फायदा घेत चोरट्यांनी मारला हॉटेलवर डल्ला ,पावणे दोन लाखांची रोख रक्कम लांबवली
जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी आहे त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दापोली गिम्हवणे येथील हॉटेल कोहिनूर फोडून हॉटेलमध्ये ठेवलेली पावणे दोन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली यामध्ये हॉटेलमध्ये काम करणारे रवींद्र शिवगण यांनी पोलिसांकडे फिर्याद केली आहे अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या मागील दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेली तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम लांबवली
www.konkantoday.com