रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरात विविध भागात जंतूनाशक फवारणी सुरू
सध्या काेराेनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे काही दिवसांपूर्वी शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर जंतुनाशक फवारणी केली होती आता शहराच्या विविध भागात नगरपालिकेने फवारणी सुरू केली आहे शहरातील काही भागातील रस्ते अरुंद आहे त्या ठिकाणी फवारणी करण्यासाठी छोट्या गाडीचीही निर्मिती नगर परिषदेने केली आहे नगराध्यक्ष बंड्या साळवी हे या कामी जातीने लक्ष घालत आहेत
www.konkantoday.com