रत्नागिरी आर्मी संस्थेचे रक्तदान शिबिर
कोरोनाच संसर्ग वाढण्याची भीती असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. अशावेळी त्यांना सामाजिक भावनेतून सहकार्य करण्यासाठी रत्नागिरी आर्मी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी आर्मी तयार झाली असून सुदृढ समाजासाठी हि आर्मी काम करते. याच भावनेतून आगामी काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन रत्नागिरी आर्मी ने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून याही वेळी कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचेही पालन केले जाणार आहे.
त्यामुळे इच्छुकांनी आपली नावे 9422003128 या नंबर वर कळवावी असे आवाहन रत्नागिरी आर्मी कडून करण्यात आले आहे.३१ मार्च रोजी सकाळी 10 ते 2 ह्या वेळात स्वा. सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे. ह्या मध्ये जे नियमित रक्तदान करतात आणि ज्यांना रक्तदान करून 3 महिने पुर्ण झालेले आहेत अशा व्यक्तीच या शिबिरात सहभागी होऊ शकतात.
रक्तदान शिबिराचे वेळी एका वेळी 3 ते 4 जणांना आत मध्ये घेतले जाणार आहे. इच्छुकांना रक्तदान करण्यासाठी येण्याची वेळ सांगण्यात येईल. ज्यांना डायबेटीस, प्रेशर इत्यादी आजार असल्यास किंवा कोणतीही गोळी चालू असल्यास त्यांनी ह्या शिबिरात सहभागी होऊ नये.