
जिल्ह्यात सापडले स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण
कळंबणी रुग्णालयातून काेरोना तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यातील ९ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले.मात्र त्यातील ५ जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे आढळुन आले आहे.त्यामुळे आता कोरोनाचे संकट समोर असताना स्वाईन फ्लूने देखील डोकेवर काढल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.सध्या हे रुग्ण कळंबणी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
www.konkantoday.com