चिपळूण येथील अॅड. सुधीर चितळे यांचे दिर्घ आजाराने निधन
चिपळूण येथील अॅड. सुधीर चितळे (वय. 70) यांचे काल दिर्घ आजाराने निधन झाले. अनेक संस्थांचे त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले शिस्तप्रिय, निस्वार्थी निगर्वी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे वडील परशुराम चितळे हेही कायदेतज्ञ आणि चिपळूणचे नगराध्यक्ष होते.वकीली क्षेत्रात नव्याने येणार्याला ते मार्गदर्शन करायचे. ४५ वर्षाहून अधिक काळ त्यांनी वकीली केली हाेती
www.konkantoday.com