व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी*

* रत्नागिरी – गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याविषयी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज रत्नागिरी येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुवर्णा सावंत तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मकरंद साखळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, मनसेचे जिल्हा संघटक श्री. अजिंक्य केसरकर, श्री. प्रवीण बोरकर, श्री. भाई राऊत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विष्णू बगाडे आणि संजय जोशी उपस्थित होते. व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्र्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, यादिवशी होणाऱ्या पाट्र्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते, हे या दिवशी होणाऱ्या अनैतिक संबंधांतील वृद्धी दर्शवते. तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात. काही धर्माध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘लव्ह जिहाद’ चा बळी बनवतात. या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. १. १४ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष पथके गस्ती पथके नियुक्त करून महाविद्यालय परिसरात अपप्रकार – करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेणे, वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करणे आदी उपाययोजना कराव्यात.२. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण पाहता शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी ‘मार्गदर्शक सूचना’ निर्देशित करण्यात याव्यात.३. संकटकाळात साहाय्य व्हावे म्हणून युवतींसाठी ‘हेल्पलाईन क्रमांक’ जाहीर करावा.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button