
महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे-खासदार संजय राऊत
आगामी विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेऊन लढवणार असं ठरलं होतं. परंतु महाविकास आघाडीनं एकत्रिपणे घेतलेल्या निर्णयाच्या विपरीत वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलं आहे.त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे मोठी मागणी केली आहे.यावेळी संजय राऊत म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेलं आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्विकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल असंही राऊतांनी म्हटलंय.www.konkantoday.com