पुणे येथुन माेठयाप्रमाणावर चाकरमानी कुंभार्ली घाटमार्गे रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या वेशीवर ,प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा
जिल्हाबंदी मुळेअडकून राहिलेल्या
पुणे बीड येथील शेकडो जण विविध वाहन घेऊन कुंभार्ली घाट मार्ग रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करत होते त्यांना अलोरे शिरगाव पोलिसांनी कुंभार्ली चेकपोस्टवर अडवून ठेवले आहे कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून फक्त अत्यावश्यक व जीवनावश्यक वाहतुकीसाठी घाट सुरू ठेवण्यात आला आहे हे सर्व तरुण चिपळूण गुहागर संगमेश्वर भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे स्थानिक ग्रामस्थांनी त्यांची चहा पाण्याची सोय केली मात्र या लोकांना प्रवेश द्यावयाचा की नाही याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे जर प्रवेश नाकारला त्या लोकांना परत जावे लागणार आहे
www.konkantoday.com