रत्नागिरीतील शेअर रिक्षा वाहतूकी बाबत गांभीर्याने विचार होणे जरुरीचे
काेराेनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने अनेक कडक उपाय योजना सुरू केले आहेत रेल्वे खासगी बस आधी सार्वजनिक वाहतूक करणाऱया यंत्रणा शासनाने बंद केले आहेत रत्नागिरी शहरात अजूनही रस्त्यावरून रिक्षा धावताना दिसत आहेत याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेणे जरुरीचे झाले आहे अनेक ठिकाणी शेअऱ रिक्षाच्या नावाखाली एका रिक्षामध्ये चार लोक बसवली जात आहेत मुळात शेअर रिक्षासारख्या रिक्षांमध्ये येणारे प्रवासी हे अनोळखी असतात व त्यांना दाटी दाटीने रिक्षात बसवण्यात येत असल्यामुळे एकमेकांना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे आजही अशा रिक्षातून वाहतूक होत आहे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने याबाबत तातडीने लक्ष घालणे जरुरीचे आहे तसेच रिक्षा संघटनांनीही पुढाकार घेऊन रिक्षांमध्ये बसणाऱयांची मर्यादा ठरवून घेणे जरुरीचे आहे
www.konkantoday.com