महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. आता महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ८९ रुग्ण झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४१५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात कोरोनाचे नवे १५ रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.६८ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. फिलिपींसचा नागरिक असलेल्या या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com