प्रत्येकाने स्वत: व स्वता:च्या कुटुंबासाठी कलम १४४ ची अंमलबजावणी करा
– लक्ष्मीनारायण मिश्रा
राज्यासह रत्नागिरी जिल्हयात करोना संसर्ग टाळण्यासाठी कलम १४४ लागू झाले आहे. आता प्रत्येकाने स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाला सहकार्य करून कलम १४४ ची अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. प्रशासनाकडून कोरोनाशी मुकाबला करताना अधिक खंबीर पावले टाकली जात आहोत, असे असले तरी नागरीकांनी न घाबरता आपल्या दैनंदिन सवयी बदलणे गरजेचे आहे. आपणाला फक्त सार्वजनिक ठिकाणी गटाने फिरण्यास व बाहेर एकत्रित राहण्यास मज्जाव करण्यात येत आहे. कोणीही घाबरून जावू नये, ही लढाई एका विषाणूशी आहे आणि त्यासाठी संसर्ग टाळणे हाच सद्या उपाय असल्याने प्रशासनाला १४४ लागू करण्याची वेळ आली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. याबाबत सूचनांचे पालन न केल्यास संबंधितावर दंडनीय तसेच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
www.konkantoday.com