दापोली तालुक्यात ७१ जण होम क्वॉरोंटाईन पाच जण स्वतंत्र कक्षात,एकही संशयित नाही
दापोली तालुक्यातील आजवर ७१ जणांना तपासून होम क्वॉरोंटाईन करण्यात आले असून ५ जणांना स्वतंत्र कक्षात ठेवल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.शिवा बिरादार यांनी दिली. जे होम क्वॉरोंटाईन करण्यात आले आहेत व स्वतंत्र कक्षात त्यांनाही ‘करोना’ ची कोणतोही लक्षणे दिसत नव्हती मात्र परदेशातून आलेल्या व्यक्तीला तपासून सुरक्षेसाठी होम क्वॉरोंटाईन करण्यात आल्या आहेत. कतार वरून आलेला व्यक्ती ची स्वागतार्ह भूमिका! स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलेल्यापैकी एक व्यक्ती कतार वरून आली आहे. ती व्यक्ती एअर पोर्ट वरून थेट दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली व स्वतःहून तपासणी करून आपल्याला कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी स्वतंत्र ठेवण्यात यावे माझ्या घरच्यांना कोणताही त्रास होता नये अशी स्वागतार्ह भूमिका घेत स्वतंत्र कक्षात दाखल झाली आहे. तालुका प्रशासनाने ८४ कॉटची जय्यत व्यवस्था करण्यात अली आहे.
www.konkantoday.com