कोरोनाच्या बाबतीत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
कोरोनाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अफवा अथवा अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यास प्रतिबंध असतांना देखील जैतापूर येथील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर नाटे परीसरात पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा खोटा मजकुर प्रसिद्ध केला.त्यामुळे समाजामध्ये शत्रुत्व, द्वेषभावना,भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करून अफवा पसरवली म्हणून सदर मजकूर ज्या फोन नंबरवरून टाकण्यात आला आहे त्याविरुद्ध सागरी पोलीस ठाणे नाटे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com