कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हयातील बँकाना सूचना
रत्नागिरी दि. २१ -: कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण महाराष्ट्रात राज्यात आढळून येत असल्यामुळे या कोरोना विषाणू (COVID-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे व प्रतिबंधक उपाययोजना एक भाग म्हणून नागरिकांचीएका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत वारंवार राज्य व केंद्र सरकारकडून सूचना प्राप्त होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयातील सर्व बँकाना पुढीलप्रमाणे उपाय योजना करणे आवश्यक आहे. सर्व बँकानी 31 मार्च 2020 पर्यंत फक्त रोख भरण करणे व काढणे ही दोनच कामे प्राधान्याने करावी. बँकानी आपले पुरेसे कर्मचारी सदर कामासाठी नेमावेत जेणेकरुन ग्राहकांना बँकेच्या शाखेमध्ये कमीत कमी वेळ व्यतीत करता येईल. बँकानी एका वेळेस जास्तीत जास्त चार ते पाच ग्राहकांना शाखेमध्ये येणास परवानगी द्यावी व प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना बँकेत आतमध्ये येण्यास परवानगी देऊ नये.दोन ग्राहकांमध्ये रांगेत १ मीटर इतके अंतर ठेवावे. सर्व बँकानी आप आपल्या ग्राहकांना इतर वितरण पर्यायांचा म्हणजे इंटरनेट बँकीग, मोबाईल बँकींग व युपीआय, एटीएम, कॅश डिपॉझिट मशिन इ. सुविधांचा वापर करण्याबाबत आवाहन करावे. सर्व बँकानी आप आपल्या एटीएम, कॅश, चेक डिपॉझिट, पासबुक प्रिंटीग ई सेवा असणाऱ्या मशीनची वेळोवेळी स्वच्छता करावी तसेच सर्व कर्मचाऱ्यांना व ग्राहकांस सॅनिटायझर/साबण व पाण्याने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी. ग्राहकांनी बँकेच्या काऊंटर पासून ३ ते ५ फुटाचे अंतर ठेवावे. वय वर्ष 60 वरील ग्राहकांनी आपल्या बँक खात्यावरील व्यवहारांसाठी 31 मार्च 2020 पर्यंत शक्यतो बँक शाखेस प्रत्यक्ष भेट देऊ नये