रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या जीर्ण मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामाला वेग
रत्नागिरी शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यामध्ये ज्या जीर्ण मुख्य जलवाहिनीचा अडथळा होता, तो लवकरच दूर होणार आहे. नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि पाणी सभापती विकास पाटील यांनी जातिनिशी यामध्ये लक्ष घालून पाटीलवाडी येथील नदीतून नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम करून केले. येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. साळवी स्टॉप येथील टाकी फुल्ल झाल्यास शहरवासियांना पुरेसे पाणी देणे पालिकेला शक्य आहे.
www.konkantoday.com