रत्नागिरी नगरपालिकेला लवकरच नवा कार्पोरेट लूक,नवी इमारत लाभणार, निधी मंजूर
रत्नागिरी नगर परिषदेची इमारत उभारण्यासाठीचा आराखडा नव्याने तयार करण्यात आला आहे. सुसज्ज अशा ग्रीन इमारतीसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तळमजल्यावर नगराध्यक्ष आणि पदाधिकारी, पहिल्या मजल्यावर ब आणि क वर्गातील कर्मचारी तर शेवटच्या मजल्यावर सभागृह आणि कॉन्फरन्स हॉल अशी ४५० कर्मचार्यांची बैठक व्यवस्था असलेली आयटी ऑफिसच्या धर्तीवर सुसज्ज इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत तीन मजली इमारतीची माहिती देण्यात आली. भविष्यातील वाढीव कर्मचार्यांचा विचार करून इमारत उभारण्यात येणार आहे. इमारतीच्या तळमजल्यावर नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वतंत्र दालनासह १४५ कर्मचारी यांची बैठक व्यवस्था असणार आहे.
www.konkantoday.com