
मुंबई गोवा महामार्गावर कोंडमळा येथे दोन कारचा अपघात १मृत्यूमुखी ७ जखमी
मुंबई गोवा महामार्गावर कोंडमळा येथे दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात जगदीश मसूरकर हे मृत्युमुखी पडले तर इतर सात जण जखमी झाले मुंबई मालाड येथे राहणारे मसुरकर कुटुंबीय मसुरे मालवण सिंधुदुर्ग येथून मुंबईच्या दिशेने बलेनो गाडीमधून जात होते त्यांची गाडी काेंड मळा येथे आली असता चिपळूणहून सावर्डे कडे भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रीझा गाडीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली त्यात जगदीश यांचा मृत्यू झाला तर दोन्ही गाड्यातील सात जण जखमी झाले यांच्यावर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत
www.konkantoday.com