
ओएलएक्सवरून गाडीची खरेदी पडली महाग, अडीच लाख रुपयांना गंडा
ओएलएक्सवरून बोलेरो गाडीची खरेदी करणारा लांजा येथील उमेश खामकर यांची २ लाख ३२ हजारांची फसवणूक होण्याचा प्रकार घडला. लांजा तालुक्यातील आरगांव देवमाळा येथे राहणारे उमेश खामकर यांनी ओएलएक्स ऍपवर बोलेरो गाडीच्या विक्रीची जाहिरात पाहिली. त्यांनी सदर जाहिराती टाकणार्या इसमाशी संपर्क केला असता त्याने आपले नाव तुकाराम केडा (रा. जयपूर, राजस्थान) असे सांगितले. व त्यांनी आपल्याला गाडी विकायची आहे असे सांगितले. व आपले अकौंट नंबर देवून त्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ठरलेली किंमत २ लाख ३२ हजार फिर्यादीने आरोपी तुकाराम याच्या खात्यावर २ लाख ३२ हजार रुपये जमा केले. मात्र प्रत्यक्षात आरोपीने पैसे घेवून गाडी दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर उमेश खामकर यांनी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com