रत्नागिरी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू,अत्यावश्यक वस्तुं विक्रेते वगळले २३ ते ३१ तारखेपर्यंत एसटी व खासगी गाड्या बंद
रत्नागिरी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.
पाच पेक्षा अधिकजण जेथे एकत्र येतात अशी ठिकाणे बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हयातील योगा/नृत्य व इतर क्लासेस, अभ्यासीका, लग्न व अन्य समारंभांची सभागृहे, कम्युनिटी सेंटर, जनरल स्टोअर, पानपटी, कॉफी/ज्युस हाऊस, सर्व हॉटेल्स (होम डिलीव्हरी वगळून) व इतर सर्व दुकान आस्थापना जेथे पाच पेक्षा जास्त लोक एकाच वेळी एकत्रित येत आहेत, हे साथ रोग प्रतिबंधत्मक कायदा 1897 अन्वये दिनांक 19 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात येत आहे.अत्यावश्यक वस्तुं विक्रेते उदा. किराणा सामान (Grocery), दुध, भाजीपाला, फळे व औषधालये (Chemist Shop) यासाठी सदरचा आदेश लागू होणार नाही.त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हय़ामध्ये १९ ते ३१ तारखेपर्यंत मद्यविक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेरगावी जाणाऱया एसटी बस तसेच खासगी बस २३ तारखेपासून ३१ तारखेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.तसेच रस्त्यात थुंकणाऱयांना एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
www.konkantoday.com