
नळपाणी योजनेच्या पाईपलाईनवरून बाचाबाची, एकाला मारहाण, दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल
चिपळूण रेहळ गावणवाडी येथील दर्शना नाचरे यांना नळपाणी योजनेच्या पाईपलाईनवरून वाद करून मारहाण केल्याप्रकरणी व साक्षीदार देवाशी नाचरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याप्रकरणी विनायक बेटकर व प्रसाद बेटकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी यांच्या जमिनीतून निर्यादी यांच्या घराकडे जाणार्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळपाणी योजनेच्या पाईपची लाईन आरोपीच्या घरासमोरून जात असल्याने वारंवार वाद होत असत. यावरून फिर्यादी दर्शना नाचरे हिला मारहाण केली व साक्षीदार देवाशी नाचरे हिचे मंगळसूत्र चोरून नेले. अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com