
खासगी बसचालकांकडून जादा प्रवास भाडे आकारले जात असेल, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई
खासगी बसचालकांकडून जादा प्रवास भाडे आकारले जात असेल, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत.
सध्या शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी गावी जात आहेत. या काळात खासगी बसचालकांकडून जादा प्रवास भाडे आकारत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. बसचालकांनी बांधिलकीतून योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे, असेही परब यांनी या वेळी संगितले.
www.konkantoday.com