कोकण रेल्वेचे प्रवासी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट, प्रवास टाळण्याकडे प्रवाशांचा कल
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण राज्यात आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. परीक्षांचा कालावधी असला तरीही कोरोनाच्या धास्तीने प्रवास करणार्याची संख्या रोडावल्याचे चित्र दिसत आहे. त्यातून कोकण रेल्वेही सुटलेली नाही. गोवा, कर्नाटकसह कोकणातून मुंबईला जाणार्यांची संख्या कमी असल्याचे नियमित निरीक्षण करणार्यांकडून सांगितले जात आहे.
www.konkantoday.com