एच एनर्जी कंपनीचा गॅस पाईपलाईनचा सर्व्हे ग्रामस्थांनी रोखला
रत्नागिरी तालुक्यात जयगड ते मंगलोर पाईपलाईनसाठी जयगड परिसरात त्या ठिकाणच्या १६ गावातील एकाही सरपंच अगर शेतकर्यांना कल्पना न देताच एचएनर्जी कंपनीकडून खुल्या सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले. प्रशासनाची परवानगी वा कोणतीही अधिसूचना न घेताच सुरू केलेल्या या कामाची कार्यवाही कळझोंडी येथील संतप्त ग्रामस्थांनी रोखून धरली. त्यामुळे सर्व्हेसाठी आलेल्या अधिकार्यांना माघारी धाडण्यात आले.
या गॅस पाईपलाईनसाठी यापूर्वीच सॅटेलाईट सर्व्हे करण्यात आला होता. गॅस पाईपलाईनच्या बाधित गावामध्ये जयगडमधील चाफेरी, रीळ, वाटद, वरवडे, कळझोंडी, निवेंडी तसेच चाफे, ओरी, धामणसे, वेतोशी, मासेबाव, निवळी अशी सोळा गावे समाविष्ट आहेत. त्या सर्वेक्षणाच्या सातबाराप्रमाणे जमिनीची मोजणी कार्यवाही हाती घेण्यात आली.
www.konkantoday.com