
कशेडी बोगद्यात गळती; पण कोणताही धोका नाही: मंत्री शिवेंद्रसिंह भाेसले
कशेडी बाेगद्यात गळती आहे. मात्र, बाेगद्यात काेणताही धाेका नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भाेसले यांनी गुरुवारी कशेडी बाेगद्याच्या पाहणीदरम्यान दिली. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेतमंत्री शिवेंद्रसिंह भाेसले यांनी गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची पाहणी केली. कशेडी बोगद्यातून गळणाऱ्या पाण्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना मंत्री भोसले म्हणाले की, सध्या बोगद्यातून गळणाऱ्या पाण्यामुळे कोणताही धोका नाही. तांत्रिक बाबींची पाहणी करून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.




