रत्नागिरीतील माऊंटेनिअर्स सदस्यांनी केला प्रसिद्ध लिंगाणा सुळका सर


रत्नागिरी येथील माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी किल्ले लिंगाणा या सुळक्यावर यशस्वी चढाई केली. अंदाजे ९०० फूट उंचीचा लिंगाणा सुळका असोसिएशनचे सचिव राजेश नेने यांच्या नेतृत्वाखाली १६ जणांनी सर करून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
लिंगाण्यावरील चढाई ही पुण्याच्या मोहरी गावातून होते. परंतु रत्नागिरीकरांनी त्याच्या उलट बाजूच्या पाने गावातून चढाईचा मार्ग निवडला. बोराट्याची नाळ या अवघड वाटेतून मजल दरमजल करत सर्वजण लिंगाण्याच्या बेस कॅम्पला सकाळी पोहोचले. मुरबाड येथील दीपक विशे, कुसूम विशे व त्यांचे दोन सहकारी, राजेश नेने, आकाश पालकर व गावातील बबन कडू यांनी नारळ देऊन मोहिमेची सुरूवात केली. जवळजवळ ६० टक्के उंचीपर्यंत रोप फिक्त करून परत खाली बेस कॅम्पला आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button