
गणपतीपुळे येथील श्रींचे दर्शन बंद झाल्याने गणपतीपुळ्यात शुकशुकाट, दुकाने व हॉटेलही बंद
लोकांची गर्दी रोखण्यासाठी गणपतीपुळे देवस्थानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंदिर बंद केले आहे. त्यामुळे या परिसरात पूर्णतः शुकशुकाट पसरला आहे. गणपतीपुळ्यात पर्यटकांनी पाठ फिरवल्याने या भागातील दुकाने, हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. मुख्य मंदिरालाही कुलूप लावण्यात आले असून केवळ पुजार्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. मंदिराचे रक्षक या परिसरात फिरत अाहेत. पर्यटक नसल्याने या सर्वाचा परिणाम हॉटेल तसेच रिसॉर्टवर झाला आहे. एमटीडीसीवरही मोठा परिणाम झाला असून ८० टक्के बुकींग रद्द झाल्याने एमटीडीसी आवारातही पूर्णपणे शांतता पसरली आहे.
www.konkantoday.com