
दहा कोटींची बिले कंपनीने दिलेली नसल्याने संतप्त पोट ठेकेदारानी कामे बंद पाडली
मुंबई -गाेवा महामार्गावरील परशुराम ते खेरशेत या ३६ किलोमीटरचे काम चेतक एंटरप्राईजेस या कंपनीने घेतले आहे.गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या कामातील काही भाग हा स्थानिक सात पोट ठेकेदारांकडून केला जात आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठेकेदारांची सुमारे दहा कोटींची बिले कंपनीने दिलेली नसल्याने संतप्त पोट ठेकेदारानी या टप्प्यातील ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत ती सर्व बंद केली. त्याचबरोबर कंपनीकडून काही ठिकाणी सुरू असलेली कामे बंद पाडली. कंपनीच्या कामथे येथील गेटवर डंपर उभा करून गेटही बंद केले. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरण करणार्या कंपन्यांचे पैसे केंद्र सरकारने थकविले आहेत. त्याचा परिणाम चौपदरीकरणावर झाला आहे
www.konkantoday.com