मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा परिसरात केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांत घट
गोवा आणि मिर्या-नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा परिसरात येणार्या ब्लॅक स्पॉटवरील अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. वाहन चालकांवर नियंत्रण ठेवतानाच ब्लॅक स्पॉटवर केलेल्या उपाययोजना आणि महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम यामुळे अपघातांच्या प्रमाणात घट झाली आहे.
हातखंबा वाहतूक पोलीस मदत शाखेकडूनही अपघात कमी होण्यासाठी विशेष काळजी घेतली होती. त्याचाही फायदा यामध्ये झाला असून गतवर्षीच्या तुलनेत वर्षभरात १९ अपघात कमी झाले, असे महामार्ग वाहतूक पोलीस हातखंबा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी सांगितले.
www.konkantoday.com