
शिवार आंबेरे येथील तरूणाला वीज जोडणी देण्यास महावितरणकडून दिरंगाई
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील एका कष्टकरी तरूणाला घरात वीज कनेक्शन मिळण्यासाठी गेल्या ६ वर्षापासून प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. कोटेशन, अर्ज आदी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही स्थानिक पुढार्यांच्या दबावामुळे या तरूणाच्या मागणीकडे महावितरणने कानाडोळा केला आहे. त्यामुळे हताश झालेल्या संतोष लक्ष्मण पेजेने २३ मार्चपासून महावितरण कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com