राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्याची कोकणाची ताकद -आमदार भास्कर जाधव
पर्यटन, फलोत्पादन आणि मत्स्यव्यवसायातून राज्याची आर्थिक बाजू सक्षमपणे सांभाळण्याची ताकद कोकणात आहे. कोकणच्या विकासासाठी प्रत्येक वर्षी ४ हजार ५०० कोटी द्या ते फुकट किंवा मदत म्हणून नको, मेहरबानी तर अजिबात नको, पुढच्या पाच वर्षात कराच्या रूपाने ते परत घ्या, अशी मागणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.
ते म्हणाले, दहा वर्षासाठी साडेचार हजार कोटी देणे सरकारला अवघड नाही. कारण सरकारचे बजेट चार लाख कोटींचे आहे. या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये २४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सरकारने तीन महिन्यांसाठी मंजूर केल्या आहेत.
www.konkantoday.com