
मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या महिलेचे १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविले
मुंबई-परेल येथे राहणार्या धनश्री सावंत या फेब्रुवारी महिन्यात मांडवी एक्स्प्रेसमधून सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करीत असताना खेड रेल्वे स्थानकात त्यांना झोप लागली. त्यानंतर त्यांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले असता पर्समध्ये ठेवलेला मोबाईल व मंगळसूत्र व अन्य १ लाख ६५ हजार रु. किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे आढळून आले. याबाबत खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com