
करोनामुळे शेकडो टन हापूस आंबा बाजारात पडून
करोनाचा परिणाम विविध क्षेत्राला बसत असताना आता याचा फटका कोकणला देखाल बसत आहे. करोनामुळे शेकडो टन हापूस आंबा बाजारात पडून आहे. करोनाच्या धास्तीने आखाती देशांनी हापूस आंब्याची निर्यात थांबवली आहे. यामुळे याचा फटका कोकण हापूस आंबा बागायतदारांना बसणार आहे. सध्या आंब्याची पेटी ६००० रुपयांना विकली जात आहे. मात्र, करोनामुळे पेटीचा दर कमी होण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, वाशी मार्केटमध्ये दररोज ४००० आंब्याच्या पेटी येत असतात. मात्र, निर्यातीवर बंदी असल्यामुळे शेकडो टन आंबा पडून आहे.
www.konkantoday.com