
चिपळुणातील १२ कोटींच्या बोगस कामांकडे दुर्लक्ष का? माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांचा आरोप.
चिपळूण शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली १२ कोटी ६१ लाख रुपयांची कामे बोगस होत आहेत. याची तक्रार करून दोन महिने झाले तरी संबंधित ठेकेदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष का असा सवाल माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी मुख्यादिकारी विशाल भोसले यांना निवेदनाद्वारे केला आहे.चौकशीसह कारवाई करण्यासाठी १५ दिवसांची डेडलाईन देत दबावापोट सुरू असलेली अतिक्रमणावरील कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे. अन्यथा नगर परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.www.konkantoday.com