
भारत सरकारने 15 एप्रिलपर्यंत विदेशातून येणाऱ्यांचे केले व्हिजा रद्द
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना व्हायरसला जागतिक महामारी घोषित केले आहे. याच कारणांमुळे आता भारत सरकारने 15 एप्रिलपर्यंत विदेशातून येणाऱ्यांचे व्हिजा रद्द केले आहे. 13 मार्चपासून हे प्रतिबंध लागू होणार आहे. यामध्ये केवळ राजकारणी, अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कर्मचाऱ्यांना सूट मिळणार आहे.
www.konkantoday.com