
खेडमध्ये इको कारमधून पकडला दोन किलो गांजा
मुंबई-गोवा महामार्गावरील खवडी येथील हॉटेल अनुसयानजिक इको कारमधून २ किलो गांजाची वाहतूक करणार्या एकास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाठलाग करत शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिताफीने पडकले. २७ हजार रुपये किंमतीचा गांजा, ५ लाख रुपये किंमतीची इको कार व अन्य साहित्य असा ५ लाख ४४ हजार २१२ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. संशयिताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोरे, शिपाई अजय कडू, वैभव ओहोळ, प्रकाश पवार, कृष्णा बांगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
www.konkantoday.com