
रत्नागिरी येथील निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटरला आग
रत्नागिरी शिवाजीनगर येथील डॉक्टर नाफडे यांच्या निष्कर्ष डायग्नोस्टिक सेंटरला आज सकाळी अचानक आग लागली.या सेंटर मधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले हे पाहून तेथील स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.आगीची बातमी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला कळल्यानंतर घटनास्थळी दोन अग्निशामक बंब दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली.या आगीत मोठय़ा प्रमाणात निष्कर्ष डायग्नोसिस सेंटरचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
www.konkantoday.com