कोकण कृषी विद्यापीठ बासमतीसारखे नवीन भाताचे वाण विकसित करणार -कुलगुरू डॉ. संजय सावंत


दोन वर्षात बासमतीप्रमाणे सुगंधित आणि लांब दाणा असलेल्या नवीन भाताचे वाण विकसित करू, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोकणात ओल्या काजूगरांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यासाठी काजूवरही संशोधन सुरू असून वेंगुर्ला वाणांमधून कमी चिक असणार्‍या आणि उघडण्यास सोपी जाईल अशा काजूची निर्मिती करण्यावरही संशोधन केले जात आहे. केवळ एक किंवा दोन वर्षे संशोधन न करता एखाद्या थीमवर आधारित संशोधन करण्यासाठी नवनवीन विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठ प्रोत्साहन देत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button