कोकणात येणाऱया पर्यटकांना समुद्रा खालचे जग दाखवण्यासाठी शासनाचा पाणबुडी प्रकल्प
कोकणात येणाऱया पर्यटकांना पाणबुडीत बसून समुद्री जीवन दाखवण्याची योजना कोकणातून सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली कोकणचा समुद्रकिनारा ,तेथील वनराई व अन्य निसर्ग संपदा हे वैभव आहे कोकणचे हे वैभव व निसर्ग सौंदर्य जगापुढे आले पाहिजे पर्यटकांना येण्यासाठी सुविधा हव्या आहेत त्यासाठी रस्त्याची कामे सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये काही काँक्रीटचे तर काही टिकाऊ रस्ते शासन बांधत आहे .
www.konkantoday.com