देशमुख प्रकरणातील फरार आरोपींचा खून : अंजली दमानियांचा मोठा दावा!

288 पैकी 118 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. अशावेळी हे गुन्हेगार विधानसभेत जाऊन काय करणार? धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी. अंजली दमानिया देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला-अंजली दमानिया या देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्या. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे देखील या वेळी त्या म्हणाल्या. या प्रकरणात फरार आरोपींचा खून झाला असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्या संबंधी त्यांना आलेल्या कॉलची माहिती देखील त्यांनी दिली.

बीड-आजचा मोर्चा म्हणजे राजकीय ड्रामा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे त्या मोर्चात सहभागी न होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या‎ आंदोलन करणार आहेत. या वेळी त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट देखील घेतली. या प्रकरणातील आरोपींचा खून झाल्यासंदर्भात माहिती देणारा आपल्याला कॉल आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.पोलिस असो किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा असेल, ते केवळ जी हुजुरी करत आहेत. ही सर्व यंत्रणा राजकीय लोकांनी सांगतले तेवढेच काम करत आहेत.

हे आता थांबायला हवे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्यांना धनंजय मुंडे कसे आहेत, हे माहिती आहे. त्यांचे अनेक कारनामे आम्हाला पाठिशी घालावे लागले असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे आम्ही मोर्चात सहभागी न होता, ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणात अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. आपल्याला आलेल्या कॉलचा हवाला देत या प्रकरणातील आरोंपींचा खून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भातील माहिती आपण बीडच्या एसपींना दिली आहे. त्यामुळे पुढील चौकशी करण्याचे त्यांचे काम आहे. मात्र, या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

महाराष्ट्रामध्ये 288 आमदार निवडून आले आहेत. त्यातील 118 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. अशावेळी हे गुन्हेगार विधानसभेत जाऊन काय करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे लोक आपल्यासाठी कायदे बनवणार, हे बुद्धीला पटत नसल्याचे देखील दमानिया यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्याने मंत्री पदाची शपथ घेतली, तो व्यक्ती आम्हाला विधानसभेतच नको. त्यामुळेच आम्ही त्यांच्या राजीनामाची मागणी करत असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button