प्राध्यापक भरतीच्या निर्णयाचे स्वागत परंतु निर्णयाची अंमलबजावणी लवकर व्हावी’ : अभाविप
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विद्यापीठ स्तरावरील अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत आणि त्या जागा लवकर भरल्या जाव्यात यासाठी अनेक वेळा अभाविप ने शिक्षण मंत्री आणि कुलगुरुना निवेदने दिली होती. मा. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी २९०० प्राध्यापकांच्या रिक्त जागा लवकरच भरणार अशी घोषणा केली. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी होणार का ? की गेल्या सरकारच्या घोषणे प्रमाणेच ही घोषणा फक्त कागदावरच राहणार का ? असा प्रश्न उपस्थित होतो
अभाविप शिक्षण मंत्री मा. उदय सामंत यांच्या निर्णयाचे स्वागत करते, परंतु मागील सरकारने घोषित केलेल्या जागांच्या व्यतिरिक्त या जागा असणार आहेत का ? आणि ही भरती प्रक्रिया कधी सुरू होणार ? या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील शिक्षणमंत्र्यांनी दिले पाहिजे. ही भरती प्रक्रिया विद्यापीठांबरोबर महाविद्यालयांमध्ये सुद्धा करावी व ही भरती प्रक्रिया येत्या शैक्षणिक वर्षाआधीच पूर्ण करावी,अशी मागणी कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी केली.
www.konkantoday.com